पुणे: इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच ISMA ने 2023-24 साखर हंगामासाठी दुसरा आगाऊ अंदाज जाहीर केला आहे. ISMA ने जानेवारी 2024 च्या दुसर्या आठवड्यातच ऊसाच्या क्षेत्राची उपग्रह प्रतिमा मिळवली आहे.
उपग्रह चित्रांनी देशभरातील शेतात आधीच कापणी केलेल्या आणि उरलेल्या न कापणी केलेल्या क्षेत्राची महिती दिली आहे. त्याचप्रमाणे कापणी व शिल्लक क्षेत्र, उत्पादनाचा सध्याचा कल, क्षेत्र भेटी आणि साखरेच्या हंगामाच्या शिल्लक कलावधीत अपेक्षित उत्पन्न या गोष्टींच्या आधारे ISMA ने साखर उत्पादनाचा दुसरा आगाऊ अंदाज जाहीर केला आहे. 2023-24 SS साठी मागील हंगामात 366 लाख टन उत्पादन झाले होते आणि यंदा अंदाजे 330.5 लाख टन साखरेचे एकूण उत्पादन झाल्याचे दर्शवले आहे. सरकारने आता पर्यन्त 2023-24 ESY साठी इथेनॉलच्या उत्पादनासाठी ऊसाच्या रस किवा बी हेवी मोलॅसेसद्वारे सुमारे 313.5 लाख टन साखर उत्पादनाची परवानगी दिली आहे.
मागील वर्षात 1 ऑक्टोबर 2023 रोजी सुमारे 56 लाख टनांचा प्रारंभिक साठा व 285 लाख टनांचा देशांतर्गत वापर आणि 313.5 लाख टनांच्या उत्पादनाचा अंदाज होता, त्यामानाने 30 सप्टेंबर 2024 रोजी सुमारे 84.5 लाख टनांचा कमीत कमी साठा असणे अपेक्षित आहे. सरकार सध्याच्या ESY मध्ये इथेनॉलच्या उत्पादनासाठी सुमारे 18 लाख टन साखरेचे उत्पादन करण्याची परवानगी देईल अशी अशा आहे.
ISMA ने माहिती दिली आहे की, मागील वर्षी 195 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते आणि या वर्षी 31 जानेवारी 2024 पर्यन्त 187.2 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. मागील वर्षी 517 साखर कारखाने सुरू होते, त्या तुलनेत या वर्षी 520 साखर कारखाने सुरू आहेत.