पुणे: बारामती येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब कामथे यांची शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली.
संचालक मंडळाच्या मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला. सोमेश्वर कारखान्याच्या उपाध्यक्ष प्रणिता खोमणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्तपदासाठी निवडूक घेण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपाध्यक्ष पदाचे नाव सुचविले असता राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी कामथे यांची निवड झाल्याचे जाहीर केले. पुणे निबंधक कार्यालयाच्या उपनिबंधक शीतल पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहिले असून त्यांना सचिव कालिदास निकम यांनी सहकार्य केले.
यावेळी माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, संचालक संग्राम सोरटे, सुनील भगत, ऋषी गायकवाड, शिवाजीराजे निंबाळकर, आनंदकुमार होळकर, विश्वास जगताप, प्रवीण कांबळे, प्रणिता खोमणे, कलम पवार, लक्ष्मण गोफणे, शैलेश रासकर, जितेंद्र निगडे, अनंत तांबे, तुषार माहुरकर, शांताराम कापरे, हरिभाऊ भोंडवे, किसन तांबे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव उपस्थित होते.