श्री निनादेवी मधील संतोष कुंभार यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड

कोल्हापूर: भारतीय शुगर या राष्ट्रीय साखर उद्योगात काम करणार्‍या संस्थेकडून ‘संतोष जयकुमार कुंभार’ यांना साखर उद्योगातील त्यांच्या विशेष योगदानाबद्दल “बेस्ट इंडस्ट्री एक्सलंस ऑफ द इयर” हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कुंभार हे डालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज शुगर यूनिट श्री निनादेवी कारखान्याचे यूनिट हेड आहेत.

पुरस्कार वितरण कार्यक्रम दि. 10 फेब्रुवारी 2024 रोजी सायाजी हॉटेल कोल्हापूर यथे पार पडणार आहे. संजय कुमार यांचे शिक्षण हे रसायनशास्त्रातील पदवीधर असून सध्या ते श्री निनादेवी करूंगली – आरळा येथील कारखान्याचे यूनिट हेड म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक ऊस उत्पादन वाढीसाठी प्रकल्प राबवून ते यशस्वी केले आहेत. संतोष कुंभार हे आधी कर्मयोगी इंदापूर, रेणुका शुगर, ओलम शुगर, सिद्धेश्वर साखर कारखाना कोल्हापूर, बारामती अग्रो, पीकॅडल्ली शुगर हरियाणा येथे उत्तम काम केले आहे. भारतातील सुमारे 530 साखर कारखान्यांमधून संतोष कुंभार यांची निवड करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *