मांजरा साखर कारखाना राज्यस्तरीय पुरस्काराचा मानकरी

लातूर: विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्यास पुण्यातील वसंतदादा शुगर इंस्टीट्यूट संस्थामार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वितीय पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला.

या बाबत कारखान्याचे चेअरमन माजीमंत्री दिलीपराव देशमुख यांचा रविवारी सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा कोंग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटणे, रेणा साखर कारखान्याचे सर्जेराव मोरे व माजी चेअरमन यशवंतराव पाटील, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुळगे, लातूर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, संचालक पृथ्वीराज शिरसाठ, संचालक राजकुमार पाटील, कोंग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके, शहर जिल्हाध्यक्ष अॅड. किरण जाधव, वडगाव सोसायटीचे चेअरमन सतीश पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका स्वयंप्रभा पाटील, अनीता केंद्रे, विजयकुमार पाटील, अजित माने, सचिन पाटील, अॅड. बाबासाहेब गायकवाड, बालाजी साळुंके, संभाजी सुळ, सुपर्ण जगताप, रमेश पाटील, शिवाजी कांबळे, विजय कदम, प्रा. शशी कदम, आदि उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *