कोल्हापूर: फराळे, लिंगाचीवाडी राधानगरी येथील ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड यूनिट 3 मधील गाळपास येणार्या उसाला 1 जानेवारीपासून गळीत अनुदान देण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतला आहे.
कारखान्याचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील यांनी गळीतास आलेल्या ऊसाची बिले 15 डिसेंबरपर्यंत प्रतिटन 3150 रुपयांप्रमाणे शेतकर्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती दिली. कारखाना व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार एक ते 31 जानेवारीपर्यंत येणार्या उसास प्रतिटन 100 रुपये गाळप अनुदान दिले जाणार आहे. तसेच जानेवारीत येणार्या उसासाठी शेतकर्याला प्रतिटन 3250 रुपये दर मिळणार आहे. एक फेब्रुवारी ते हंगामाच्या शेवटपर्यंत येणार्या उसास प्रतिटन 150 रुपये म्हणजे 330 रुपये प्रतिटन दर मिळणार आहे.
यावेळी कारखान्याचे सरव्यवस्थापक शत्रुघन पाटील, आर.आर.देसाई, दिलीप बर्गे, समीर व्हरकट, शरद पाटील उपस्थित होते.