घोडगंगा कारखाना सुरू करण्यासाठी शेतकर्‍यांचे ‘धरणे’ आंदोलन

शिरूर: कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ यांच्या चुकीच्या कारभारमुळे बंद असलेला घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करावा, यासाठी कारखाना कार्यस्थळावर भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगेंच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी धरणे आंदोलन सुरू केले.

बुधवार दि. 27 पासून शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील घोडगंगा सहकारी साखर कारखाना प्रशासकाची नेमणूक करून सुरू करण्यासाठी बुधवार दि. 27 पासून शेतकर्‍यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. संजय पाचंगेंचे म्हणणे आहे की, घोडगंगा साखर कारखाना जाणूनबुजून बंद पाडण्याचा कट असून त्याला अध्यक्ष व संचालक मंडळ जबाबदार आहे. त्यामुळे शासनाने प्रशासक नेमून कारखाना सुरू करण्याचे गरजेचे असल्यामुळे हे आंदोलन सुरू केले आहे. त्याच प्रमाणे 1 जानेवारी 2024 पासून कडक उपोषण आंदोलन सुरू करण्याचा निर्णय सुद्धा त्यांनी घेतला आहे. पाचंगे यांनी कुठलाही मंडप न घालता उसाचे पाचट अंथरूण पसरून त्यावर बसले होते. पाचंगे यांनी साखरेचा बारदाना अंगात घातला होता आणि त्यावर “घोडगंगा बचाव शेतकरी बचाव-कामगार बचाव” असे लिहिले होते.

त्यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष रामचंद्र निंबाळकर, ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष संपत फराटे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य नवनाथ भुजबळ, कामगार नेते तात्यासो शेलार, महादेव मचाले, संदीपराव महाडीक, शेतकरी संघटनेचे शरद गद्रे, ठकसेन ढवळे, महेंद्र काशीद, बापूसाहेब कोळपे आदि उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *