पैठण: श्री संत एकनाथ साखर कारखान्याच्या पंचवार्षिक नुवडणुकीमध्ये मतदार यादीवरील 149 आक्षेप अर्ज मंजूर करण्यात आले असून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मदतदार यादी विरोधातील 3 हजार 710 पैकी 3 हजार 550 आक्षेप अर्ज फेटाळण्यात आले.
2023-2028 संचालक मंडळ निवडणुकीच्या अनुसंगाने सोमवारी (दि.18) प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादी मध्ये एकूण 6 हजार 611 मतदार मतदानासाठी पात्र झाले असून जिल्हा सहकारी निवडणूक अधिकार्यानी 149 अर्ज मंजूर करून 3 हजार 550 आक्षेप अर्ज फेटाळले आहेत. यामध्ये सोसायटीमधील 106 पैकी 57 मतदार पात्र ठरले आहेत.