लोकनेते कारखान्याचा 2700 रूपयांप्रमाणे हप्ता जमा

‘लोकनेते सुंदररावजी सोळंके’ सहकारी साखर कारखान्याने दि. 21 ते दि. 30 नोहेंबर 2023 या कलावधीत गाळपास आलेल्या ऊसाच्या बिलाचा पहिला हप्ता प्रति मे.टन रुपये 2700/- प्रमाणे ऊस उत्पादन शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन विरेंद्र सोळंके यांनी दिली.

कारखान्याच्या चालू गळीत हंगामामध्ये दि. 12 डिसेंबर अखेर 37 गाळप दिवसामध्ये 174950 मे.टन उसाचे गाळप करून 9.16 टक्के सरासरी साखर उतार्‍याने 83400 क्विंटल शुभ्र साखरेचे उत्पादन घेण्यात आलेले आहे. चालू हंगामात कारखान्याकडील इथेनॉल व को.जन प्रकल्प कार्यान्वित असून आजअखेर सिरप इथेनॉल 3516249 लिटर आणि बी.हेवी इथेनॉल 242969 लिटरचे उत्पादन झाले असून 6460194 युनिट वीज महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीस वितरित केलेली आहे. दि. 6 ते 20 नोहेंबर या कलावधीत गाळप झालेल्या ऊसचा पहिला हप्ता म्हणून 2700 रुपयांप्रमाणे रक्कम यापूर्वीच ऊस उत्पादकांच्या बँक खाते वर्गात करण्यात आली होती. दि. 21 ते 30 नोहेंबर या काळात 42715.641 मे.टन गाळप झालेल्या उसाचा पहिला हप्ता प्रति मे.टन 2700 रु. प्रमाणे होणारी एकूण रक्कम रु. 11,53,32,264.00 ही दि. 13 रोजी संबंधित ऊस उत्पादकांच्या बँक खाते वर्गात केलेली आहे. या चालू हंगामात कारखान्याचे ऊस गाळप आ. प्रकाश सोळंके, उपाध्यक्ष साखर संघ मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली असून ज्या ऊस उत्पादकांचा ऊस गाळपास आलेला आहे त्यांनी आपल्या जवळच्या बँकशी संपर्क साधून आपल्या ऊस बिलाची रक्कम घेऊन जावी, असे आवाहन कारखान्याच्या चेअरमन ने केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *