या वर्षी इथेनॉलसाठी उसाचा रस/साखर सिरप वापरू नये

आज गुरुवार दि. ७ डिसेंबर रोजी केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घोषित केला आहे. साखरेचा देश-विदेशात अतिशय मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे साखरेचा देशांतर्गत पुरवठा व्यवस्थितरीत्या होण्यासाठी तसेच किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर कारखान्यांना आणि डिस्टिलरींना इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा रस वापरण्यापासून बंदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे.

बी-हेवी मोलॅसिसपासून तेल विपणन कंपन्यांना इथेनॉलचा पुरवठा सुरूच राहील, असे सर्व साखर कारखानदार आणि डिस्टिलरीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांना मंत्रालयाने संबोधित केलेल्या पत्राद्वारे संगितले आहे.

“१९६६ च्या कलम ४ आणि ५ नुसार दिलेल्या  अधिकारांचा वापर करताना, सर्व साखर कारखानदारांना आणि डिस्टिलरीजना ईएसवाय (इथेनॉल पुरवठा वर्ष) २०१३-२४ मध्ये इथेनॉलसाठी उसाचा रस/साखर सिरप वापरू नये”, असा केंद्र सरकारने निर्देश केला आहे. त्याचप्रमाणे “बी-हेवी मोलॅसिस ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून (OMCs)” प्राप्त झालेल्या ऑफरमधून इथेनॉलचा पुरवठा सुरू राहील,” असे अन्न मंत्रालयाने पत्रात म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *