शेतीसाठीच समर्पित
शेती आणि शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध व्हावे, देशाची सर्व धोरणे शेती केंद्रित व्हावी, यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलेले नामवंत कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या मागदर्शनाखाली इंडियन फार्मिंग (indianfarming.org) ही वेबसाईट सुरू केली आहे.
कोल्हापूर कृषी महाविद्यालय, पुणे कृषी महाविद्यालय आणि राहुरी कृषी विद्यापीठात तब्बल दोन तपे अध्यापनाचे काम करणाऱ्या डॉ. मुळीक यांनी अमेरिकेत कृषी व जलसिंचन अभियांत्रिकी विषयात पीएच. डी. मिळवली. त्याकाळी अमेरिकेत पीएच. डी. करणारी मंडळी तिकडेच स्थायिक होत. मात्र डॉ. मुळीक भारतात परतले आणि कृषी क्षेत्राला वाहून घेतले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध समित्या आणि संस्थांवर काम केले आहे. शेतकरी आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी तीन दशकांपासून काम करणाऱ्या भूमाता संस्थेचे ते संस्थापक आहेत. राज्य सरकारने शेती क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना कृषिभूषण आणि कृषिरत्न या कृषी क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
डॉ. बुधाजीराव मुळीक
(पीएच. डी. – कृषी व जलसिंचन अभियांत्रिकी)
(यूटाह स्टेट युनिव्हर्सिटी, लोगन – यूटाह, यूएसए )
महाराष्ट्र शासनाच्या कृषिरत्न, कृषिभूषण पुरस्कारानी सन्मानित
समृद्धीसाठी
शेती क्षेत्रामध्ये वेगाने बदल होत आहेत, मात्र ते सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. पोहोचलेच तर त्याची गती कमी असते, त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा पुरेसा लाभ मिळत नाही.
तसेच विविध सरकारी योजना, कृषी आधारित उद्योग, पूरक उद्योग, कृषी शिक्षण, विक्री व्यवस्था आदींबाबत खूप कमी शेतकऱ्यांना माहिती असते. ही पोकळी भरून काढण्यासाठी आम्ही ही वेबसाईट सुरू केली आहे.
आम्ही प्रयोगशील शेतकऱ्यांना लिहायला प्रवृत्त करत आहोत, त्यांच्या अनुभवाचाही फायदा इतरांना व्हायला हवा. तसे हे शेती व्यासपीठ सर्वांसाठी खुले आहे, आपणही लिहू शकता, प्रतिक्रिया पाठवू शकता. सर्व शेतकरी वर्गाचे कल्याण व्हावे या उद्देशाने आपण सर्वजण काम करत राहू….