सोलापूर: मकाई सहकारी साखर कारखान्याचे सन 2022-23 थकीत ऊस बील देण्याची आज अंतिम तारीख आहे. 3 जानेवारी 2024 पर्यंत बील दिले नाही तर तत्कालीन कारखान्याच्या चेअरमन व संचालक मंडळावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
मकाई सहकारी साखर कारखान्याचे सन 2022-23 थकीत ऊस बील मिळाले नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांनी झोळ सर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली. त्यावेळेस शेतकर्यांनी, ‘आम्हाला न्याय द्यावा’ अशी मागणी जिल्हाधिकारींसामोर केली. थकीत बिलासाठी गेल्या वर्षभरपासून वेळोवेळी कारखाना प्रशासन यांच्याकडे पाठपुरवठा केला, मात्र कोणी दखल घेतली नाही. त्यामुळे आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नाही. आम्हाला ऊस बील मिळवून देऊन न्याय द्यावा अशी मागणी शेतकर्यांनी केली. त्यावेळेस 3 जानेवारीपर्यंत ऊस बील दिले नाही तर तत्कालीन कारखान्याच्या चेअरमन व संचालक मंडळावर कारवाई करणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्याची माहिती प्रा. रामदास झोळ यांनी दिली. यावेळी प्रा. रामदास झोळ यांच्यासह दशरथ आण्णा कांबळे, अॅड. राहुल सावंत, रविंद्र गोडगे, प्रा. राजेश गायकवाड, हरीदास मोरे, शहाजी माने, विठ्ठल शिंदे, माधव नलावडे उपस्थित होते.
आज दि. 3 जानेवारी 2023 रोजी संबंधितांना मीटिंगसाठी बोलविले असून, त्याआधी त्यांनी ऊस बील दिलेले असणे अपेक्षित आहे आणि जर ऊस बील दिले नाही तर जिल्हाधिकारी मकाई सहकारी साखर कारखानयच्या चेअरमन, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक मंडळ यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई करणार आहेत.