महाराष्ट्रात 2023-24 च्या हंगामात, साखरेचे उत्पादन २०९ लाख क्विंटलवर पोहोचले आहे. 11 डिसेंबर 2023 पर्यंत एकूण 186 साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. त्यातील 91 सहकारी आणि 95 खाजगी साखर कारखाने आहेत. राज्यात आतापर्यंत 209.34 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून 253.44 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. सध्या राज्यात साखरेची सरासरी रिकव्हरी ८.२६ टक्के आहे.
गेल्या हंगामात 194 साखर कारखाने कार्यरत होते. त्यांनी 330.58 लाख टन उसाचे गाळप करून 297.79 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते. महाराष्ट्रात सोलापूर विभागात सर्वाधिक साखर कारखाने सुरू आहेत, आतापर्यंत ४५ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे. साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, 11 डिसेंबर 2023 पर्यंत सोलापूर विभागात सध्या 57.87 लाख टन उसाचे गाळप करून 44.04 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. आणि येथे साखर रिकव्हरी 7.61 टक्के आहे. तसेच राज्यात सर्वात कमी असलेल्या अमरावती आणि नागपूर विभागात देखील साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. अमरावती आणि नागपूर विभागातील प्रत्येकी दोन साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे.