साखर कारखान्यांचे एमडी 65 वर्षांपर्यंत कार्यरत होणार

कोल्हापूर: राज्यातील साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना वयाच्या पासष्टी पर्यन्त मुदतवाढ देण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. याआधी ही वयोमर्यादा 62 इतकी होती; परंतु यासाठी तब्बल 12 निकष लावण्यात येणार असून, त्यांची पूर्तता झाल्यानंतरच या वाढत्या वयोमर्यादेचा लाभ देता येणार आहे.

साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक पदावर कार्यरत व्यक्तिला वयाच्या 60 वर्षांनंतर द्यावयाच्या मुदतवाढीसाठी आधी 65 इतकीच वयोमार्यादा करण्यात आली होती. नंतरच्या काळात यामध्ये सुधारणा करून वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर पहिल्यांदा एक वर्ष आणि त्यानंतर शासनमान्यतेने आणखी एक वर्ष म्हणजेच संबंधिताच्या वयाच्या 62 वर्षापर्यंत मुदतवाढ देण्याची तरतूद करण्यात आली होती. यानंतर अनेक कारखान्यांकडून वयोमार्यादा वाढवण्याची मागणी होऊ लागल्याने आता पुन्हा वायच्या मुदतवाढीची मर्यादा 65 करण्यात आली आहे. गुरुवारी याबाबतचा शासन आदेश काढण्यात आला आहे. एकूणच कारखाना उत्तम पद्धतीने चालवणारी व्यक्ति असेल तर वयाच्या 65 पर्यन्त मुदतवाढ देण्यात यावी, असा उर्वरित निकषांचा आशय आहे.

पुढील निकषांची पूर्तता आवश्यक

  • समबंधित कार्यकारी संचलकांविरोधत आर्थिक गैरव्यवहार, अनियमितता, चौकशी प्रस्तापित नसावी.
  • मागील पाच वर्षांमध्ये कारखान्याच्या संचित तोट्याचे प्रमाण 75 टक्क्यांपेक्षा कमी नसावे.
  • मुदतीत घेण्यात येणार्‍या सर्वसाधारण सभेपूर्वी लेखापरीक्षणासाठी उपलब्ध करून विहित मुदतीत घेण्यात येणार्‍या सर्वसाधारण सभेपूर्वी लेखापरीक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • संबंधित व्यक्ति आरोग्यदृष्ट्या सक्षम असावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *