रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशा्ध्यक्ष तसेच ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिन नलवडे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र‘ शी बोलताना संगितले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी केलेल्या मागणीसाठी आता रयत क्रांती संघटना देखील आंदोलन करणार आहे. यंदाच्या उसाला पहिली उचल ३५०० मिळावी आणि मागील वर्षीचा दूसरा हप्ता ५०० रुपये मिळवा, या मागणीसाठी रयत क्रांती संघटना शेतकर्यांना सोबत घेऊन शुक्रवार दि. 24 नोव्हेंबर रोजी कराड तालुक्यातील बनवडी फाटा येथे आंदोलन करणार आहे.
ऊस दरासोबतच दुधाला 35 रुपये हमीभाव मिळावा ही मागणी देखील आंदोलनात करण्यात आली. सचिन नलवडे म्हणाले, एक वर्षभरापासून बाजारपेठेमध्ये साखरेचे दर 36 रुपये च्या आसपास स्थिर राहिले आहेत आणि यावर्षी 38 ते 39 रुपये साखरेला भाव मिळत आहे. साखर कारखान्यांनी इथेनॉल सहवीज निर्मिती डिसलरी अल्कोहोल असे द्वितीय पदार्थ घेतल्याने त्याचाही फायदा कारखान्यांना झाला आहे. माळेगाव व सोमेश्वर या साखर कारखान्यांनी 11.80 उतारा असताना एफआरपी पेक्षा साडे पाचशे ते साडेतीनशे रुपये जास्त दिले आहेत, मग जिल्ह्यातील कारखान्याचा उतारा साडेबाराच्या आसपास असताना एफआरपी पेक्षा जास्त पैसे का दिले नाहीत? या प्रश्नाचे उत्तर घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे दूधला देखील सरकारने जाहीर केलेला भाव सध्या मिळत नाही. लिटरला पाच ते सात रुपये कमी दराने दुधाची खरेदी केली जात आहे म्हणून दुधाला 35 रुपये हमीभाव मिळावा ही मागणी सुद्धा या आंदोलनात करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील शेतकरी 3500 उसाचा दर घेत असेल तर आपला कराडमधला शेतकरीही मागे राहणार नाही, त्याला सुद्धा असाच उसाचा भाव मिळवून द्यायचा आहे म्हणून शेतकऱ्यांनी गट तट पक्ष विसरून या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे नलवडे यांनी संगितले.