पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) ने 12 जानेवारी ते 14 जानेवारी 2024 या कलावधीत पुण्यातील मांजरी कॅम्पसमध्ये “शाश्वतता: जागतिक साखर उद्योगातील आव्हाने आणि संधी” या विषयावर तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन आयोजित केली आहे.
व्हीएसआय ही एक ISO 9001-2015 प्रमाणित संस्था आहे. या संस्थेचा हा अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे. साखर आणि संबंधित उद्योगातील टेक्नोक्रॅट्सच्या या सर्वात मोठ्या परिषदेला २१ देशांमधील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि सुमारे दोन हजार उद्योजक सहभागी होणार आहेत. या परिषदेतील माहिती मराठी भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये नामवंत आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय वक्ते साखर आणि साखरेच्या संबंधित उद्योगाच्या महत्त्वपूर्ण गोष्टींवर व्याख्याने देणार आहेत.
या परिषदेचा उपयोग साखर कारखानदार, तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञांना होणार आहे. या तीन दिवसांच्या कार्यक्रमात साखर आणि संबंधित उद्योगाच्या सुधारणेसाठी संशोधन शास्त्रज्ञ, अभियंता, तंत्रज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञ यांच्या नवीन कल्पनांवर चर्चा केली जाईल. तसेच साखर उद्योगातील उत्पादने आणि सेवांचे प्रदर्शन देखील आयोजित केले जात आहे, ज्यामध्ये व्हीएसआय प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शकांचा सहभाग पाहणार आहे. त्यामध्ये त्यांचे नवीन विचार, त्यांच्या नवीन कल्पना, उत्पादने आणि सेवांचे प्रदर्शन होईल. लघू उद्योगांसह मध्यम उद्योग तसेच ऊस उद्योगातील 200 हून अधिक सेवा प्रदत्यांना भेटण्याची व त्यांच्याशी संवाद साधण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. हा कार्यक्रम शास्त्रज्ञ संशोधक आणि तंत्रज्ञांना त्यांनी केलेला रिसर्च पोस्टर स्वरुपात साधार करण्यासाठी व उद्योगांशी चर्चा करण्यासाठी आयोजित केलेला आहे.
या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या निमित्ताने काही विषयांचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे.त्यामध्ये उसाचे विविध आधुनिक तंत्रज्ञान व सांस्कृतिक पद्धती दाखवून ऊसाचे वाण, सिंचन पद्धती, आंतरपीक मशागत, विविध कृषी पद्धती आणि पोषक तत्वे, कीड आणि रोग यांचे व्यवस्थापन याचा समावेश आहे. या कार्यक्रमाला सहभागी लोकांना परिषदेचा संपूर्ण कार्यक्रम उपयुक्त होईल, अशी व्हीएसआयची खात्री आहे.