विलास कारखान्यानचे  2 लाख 5 हजार 555 क्विंटल साखरेचे उत्पन्न

लातूर: विलास सहकारी साखर कारखान्यात तब्बल 2 लाख 5 हजार 555 क्विंटल साखरेचे उत्पन्न झाले. निवळी येथील या करख्यानयात बुधवार दि. 20 डिसेंबर रोजी चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते साखरेच्या पोत्यांचे पूजन करण्यात आले.

कारखान्याने आतापर्यंत 2 लाख 2 हजार मेट्रिक टनपेक्षा अधिक उसाचे गाळप करून 2 लाख 5 हजार 555 क्विंटल शुभ्र साखरेचे उत्पादन केले आहे. तसेच सरासरी साखर उतारा 10.35 टक्के इतका आहे. सहवीजनिर्मिती प्रकल्पात 86 लाख 42 हजार यूनिट वीज निर्मिती झाली. तसेच 10 डिसेंबर पर्यन्त गाळपास आलेल्या उसाचे 2500 रुपये प्रतिमेट्रिक टनप्रमाणे उसबिल सबंधित शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत.

यावर्षी हंगाम संपायच्या आधीच कारखान्याचे आधुनिकीकरणाचे काम करण्यात आल्यामुळे कार्यक्षेत्रातील उसाचा काहीही अडथळा न येता वेळेवर गाळप होण्यास मदत झाली. विलास कारखाना शेतकर्‍यांच्या सर्व उसाचे वेळेवर गाळप करतो, असे कारखान्याचे व्हा. चेअरमन रविंद्र काळे व कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी संगितले. विलास कारखाना हा लोकनेते विलासराव देशमुख यांची प्रेरणा, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शन व संस्थापक चेअरमन माजी मंत्री आ. अमित देशमुख, आ. धिरज देशमुख तसेच चेअरमन वैशालीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी मार्गाने पुढे जात आहे. यावेळी संचालक गोविंद बोराडे, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, गुरूनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, रंजीत पाटील, गोविंद डुरे, सूर्यकांत सुडे, अमृत जाधव, रामदास राऊत, सुभाष माने, भारत आदमाने आदि उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *