मशीन बंद ठेवणार, ऊस तोडणी मशीन मालक संघटनेचा इशारा

पुणे: ऊस तोडणी मशीन मालक संघटनेचा इशारा, जर संपूर्ण राज्यात मशीन तोडणीचे दर एकसमान करा व वाहतूक दरवाढ तातडीने जाहिर करा, नाहीतर ऊसतोड मशीन बंद ठेवून आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल.

गुरुवार दि. 18 जानेवारी रोजी महाराष्ट्र ऊसतोडणी मशीन मालक संघटनेच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याशी चर्चा केली व मागण्यांचे निवेदन देखील केले. राज्यात 1200 ऊसतोडणी मशीन कार्यरत असून सध्या हाताने ऊसतोडणीचे दर कमिशनसह 380 रुपये, डोकी सेंटर 439 रुपये, गाडी सेंटर 490 रुपये असे जाहीर झाले आहेत. डिझेलवर चालणार्‍या मशिनचे दर वेगवेगळे जसेकी 380 पासून 500 रुपयांपर्यंत प्रतिटन आहेत. सन 2020 पासून ऊस तोडणी मशीन मालक संघटना ऊसतोडणी दरवाढीसाठी पाठपुरवठा करीत असून कोणीही दखल घेत नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *