सोलापूर: शाहूनगर परिते, ता. करवीर येथील भोगावती साखर कारखान्याने या गळीत हंगामातील दि. 16 ते 31 डिसेंबर अखेरच्या पंधरवड्यातील उसाचे बिल प्रतिटन 3200 रुपयांप्रमाणे 24 कोटी 66 लाख रुपये बिल ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील- देवाळेकर, उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी दिली.
कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामातील उसासाठी प्रतिटन 3200 रुपये उसदर जाहीर केला होता. या पंधरवड्यात गाळप झालेल्या 77026 मेट्रिक टन ऊसाची 24 कोटी 66 लाख रुपयांची रक्कम संबंधित ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. कारखान्याने 59 दिवसांत 2,66,380 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 3,15,910 साखर पोती उत्पादित केली. सरासरी साखर उतारा 11.86 टक्के एवढा आहे. कारखान्याने यंदा 6 लाख टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले आहे.