सोलापूर: भरदिवसा साखर कारखान्यातींच्या गोदामात प्रवेश करून साखरेची गोणी चोरून नेल्याची घटना 18 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास अनगर येथील लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्यात घडली होती. या संदर्भात मोहोळ पोलिस ठाण्यात 21 जानेवारी रोजी अज्ञात स्कोर्पिओ चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील दोन आरोपींना मोहोळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मोहोळ तालुक्यातील अनगर येथील लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखाना येथून भरदिवसा स्कोर्पिओ क्र. एम. एच. 13- ए. झेड. 4300 मधून येऊन गोदामात प्रवेश करून गोदामातून सुमारे 32 हजार 640 रुपये किमातींची 17 साखरेची गोणी चोरून नेण्यात आली होती. यासंदर्भात कारखान्याचे कर्मचारी विठ्ठल लक्ष्मण भोसले यांनी सादर स्कोर्पिओ चालकविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर मोहोळ पोलिसांनी तातडीने कारखान्यातील सिसिटीव्ही फुटेजच्या आधारे यातील आरोपी कृष्णा बंडू सुरवसे (रा. अनगर) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी यातील आरोपी सज्जन व्यवहारे (रा. आष्टी, ता. मोहोळ) आणि विराज बाबासाहेब गुंड (रा. अनगर, ता. मोहोळ) असे असल्याचे संगितले. यावरून आरोपी सज्जन व्यवहारे याला अटक करण्यात आली असून यांच्याकडून साखरेची 17 साखरेची गोणी आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्कोर्पिओ जप्त करण्यात आली.