यवतमाळ: महागाव मधील नॅचरल शुगर अँन्ड अलाइड इंडस्ट्रिजने यंदाच्या चालू गळीत हंगामात एकाच दिवसात 4,090 मे. टन उसाचा विकमी गाळप केला आहे. सर्व मेहनती कर्मचार्यांना एका दिवसाचा पगार बक्षीस देण्यात आला.
नॅचरल शुगर अँन्ड अलाइड इंडस्ट्रिजच्या यूनिट नंबर 2 कारखान्याच्या सर्व कामगारांनी दिवसरात्र अतिशय जोमाने काम करून 21 डिसेंबर 2023 रोजी एकाच दिवसात सर्वाधिक 4,090 मे.टन उसाचे उच्चांक गाळप केले, त्यामुळे चेअरमन व कार्यकारी संचालक कृषीरत्न बी.बी. ठोंबरे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. यूनिट नं. 2 कडील सर्व कायम हंगामी, डेलीवेजेस व कॅज्वल कर्मचार्यांना एक दिवसाचा रोख पगार, दि. 23 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10:00 वाजल्यापासून अकाऊंट व इजिनियर ऑफिस मार्फत बक्षीस म्हणून देऊन त्यांचे अभिनंदन व्यक्त करण्यात आले. कारखान्याचे सर्व कर्मचारी व पदाधिकार्यांनी उत्साह व्यक्त केला.
यापुढेही कारखान्याचे सर्व सदस्य चालू हंगामात अशाच प्रकारे जोमाने कार्यरत राहतील व नवनवीन उदीष्ट पूर्ण करून हंगामातील निर्धारित केलेले 6 लाख मे. टन ऊसाच्या गाळपाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांचे पुन्हा अभिनंदन करण्यात आले.