पुणे: जानेवारी अखेर महाराष्ट्रात 207 साखर कारखान्यांमधून 716.03 लाख मे. टन ऊस गाळप झाले आहे. त्यातून सरासरी 9.67 टक्के साखर उतार्यासह 692.52 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे, असा अहवाल साखर आयुक्तालयाने दिला आहे. मागील हंगामात 778.2 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते, मात्र यंदाच्या हंगामात 81.17 लाख क्विंटलने साखरेच्या उत्पादनात घट झाली आहे.
कोल्हापूर विभागाने 162.37 लाख मे. टन उसाचे गाळप केले असून, 11.03 टक्के उतार्यासह 179.1 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कोल्हापूरमध्ये सर्वाधिक साखरेचे उत्पादन झाले आहे. पुणे विभागाने 153.16 लाख मे. टन उसाचे गाळप केले असून, साखरेचा उतारा 9.93 टक्के असताना 152.07 लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. तर सोलापूरमध्ये 154.51 लाख मे. टन ऊस गाळप झाला असून, सरासरी 8.88 टक्के साखर उतार्यासह 137.22 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. त्याचप्रमाणे, अहमदनगरमध्ये 90.29 लाख मे. टन ऊस गाळप झाले असून 9.38 टक्के साखर उतार्यासह 84.73 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 66.9 लाख मे. टन ऊस गाळप होऊन 8.32 टक्के साखर उतार्यासह 55.69 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. नांदेड भागात 79.97 ऊस गाळप झाला असून, 9.6 टक्के साखर उतार्यासह 76.79 लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. अमरावतीत 6.58 लाख मे. टन ऊस गाळप झाले असता 9.01 टक्के साखर उतार्यासह 5.93 लाख क्विंटल साखरेचे उत्पन्न झाले आहे व नागपूरमध्ये 2.25 लाख मे. टन ऊस गाळप झाले असून, 4.4 टक्के साखर उतार्यासह 0.99 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
मागील हंगामात 797.2 लाख मे. टन ऊस गाळप झाले असून, 9.76 टक्के साखर उतार्यासह 778.2 लाख क्विंटल साखर उत्पादित झाली होती. सर्व राज्यातील होणारे ऊस गाळप, सरासरी साखर उतारा आणि होणारे नवे साखर उत्पादन बघता मागील हंगामाच्या तुलनेत अपेक्षित साखर उत्पादन 81.17 लाख क्विंटलने कमी आहे.