कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील माले गावात ऊस तोडल्यानंतर तो शेतातून उचलला नसल्याने विलास बाबुराव कोडोलकर या शेतकर्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. त्याची भरपाई मिळावी अशी मागणी कोडोलकर करत आहेत.
विलास कोडोलकर यांची शेती माले ते जाफळे रोडवर बैलमळा परिसरात असून दि. 8 जानेवारी रोजी शेतातील ट्रकमालक महादेव दगडू चव्हाण व त्यांचे ऊस तोडणी कामगारांनी दालमिया कारखान्यासाठी तोडलेला ऊस शेतातून उचलला नाही. यासंदर्भात ट्रकमालक महादेव चव्हाण आणि कारखाना प्रशासनाशी संपर्क साधला असून तुटलेल्या उसाशी आमचा काही संबंध नाही, असे सांगण्यात आले.
तोडणी केलेला ऊस 16 टन असून तो शेतामध्ये पडून असून तो उचलण्यासाठी ट्रकमालक, चिटबॉय व दालमिया कारखाना प्रशासनाशी वारंवार संपर्क साधून देखील शेतातील ऊस उचलला नसल्याने कोडोलकरांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
त्यामुळे, माझ्या झालेल्या नुकसनाची भरपाई माला मिळावी आणि योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी विलास कोडोलकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पोलिस ठाण्यात ट्रकमालक आणि ऊस तोडणी कामगारांविरोधात तक्रार केली आहे.