गाळप हंगाम आढावा बैठक 2023-24 चे आयोजन

पुणे: गाळप हंगाम 2023-24 मधील गाळप सुरू झाले आहे. ऊस गाळपाचा व साखर उत्पादनाचा दूसरा अंदाज करण्याकरिता सर्व सहकारी व साखर कारखान्यांच्या मुख्य शेती अधिकारी किवा केन मॅनेजर यांची आढावा बैठक साखर आयुक्तालयात आयोजित केली आहे.

साखर आयुक्तालयातील सभागृहात, शिवाजीनगर येथे दि. 24 जानेवारी व 25 जानेवारी रोजी गाळप हंगाम आढावा बैठक घेण्यात येणार आहे. सर्व कारखान्यांच्या मुख्य अधिकारी किवा केन मॅनेजर यांनी गाळप हंगाम सन 2023-24 मध्ये नोंद झालेले ऊस क्षेत्र, आजअखेर झालेले गाळप व होणारे संभाव्य गाळप तसेच सध्याच्या स्थितीत कारखाना कार्यक्षेत्रात येत असलेली सरासरी ऊस उत्पादकता(टन प्रति हेक्टर) त्याचप्रमाणे ऊस तोडणी करिता पैशाची मागणी होत असल्यास कारवाई करण्याबाबत दि. 8 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार कारखान्यांनी तक्रार निवारण अधिकारी म्हणून नेमणूक केल्याबाबतचे पत्र, कारखान्याचा हंगाम बंद होण्याची अपेक्षित तारीख, कारखान्यांची सभासदकरिता ऊस विकासाच्या दृष्टीने राबविलेले नावीन्यपूर्ण उपक्रम व सध्या कारखान्याकडे असलेल्या एकूण ऊस तोडणी यंत्राची संख्या आणि त्यापैकि कार्यरत असलेल्या यंत्रांची संख्या, या सर्व विषयांच्या महितीसह बैठकीत हजार राहावे.

सर्व कारखान्यांच्या मुख्य अधिकारी किवा केन मॅनेजर यांनी विभागाच्या एकत्रित महितीसह सभेत उपस्थित राहावे. छत्रपती संभाजी नगर, नागपुर, नांदेड, अमरावती या विभागांनी दि. 24 जानेवारी रोजी सकाळी 11:00 ते 2:00 या वेळेत व अहमदनगर विभागाने दुपारी 3:00 ते 5:00 या वेळेत उपस्थित राहावे. सोलापूर या विभागाने 25 जानेवारी रोजी सकाळी 11:00 ते 2:00 या वेळेत आणि कोल्हापूर, पुणे विभागाने दुपारी 3:00 ते 5:00 या वेळेत उपस्थित राहावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *