अहमदनगर: खेड परिसरात शेतकर्यांनी अनोखा प्रयोग केला आहे. ऊसाच्या शेतात ड्रोनद्वारे औषध फवारणी केली आहे. शेतकर्यांच्या या प्रयोगामुळे शेतकर्यांनी विकासाची वाट धरली आहे. या प्रयोगामुळे वेळ व पैशाची बचत होणार असल्याने शेतकरी आनंदी आहेत.
कर्जतमधील खेड येथे हेक्टरमध्ये ऊसशेती आहेत. मशिनद्वारे एकराच्या क्षेत्रावर औषध फवारणी करण्यास साधारणत: तीन तास लागतात परंतु ड्रोन द्वारे केवळ 10 मिनिटात फवारणी होते. 800 रुपये एकर या दराने ही फवारणी केली जाते. एक तासात 6 ते 7 एकर क्षेत्रात फवारणी केली जाते. पूर्वी हातपंपाने फवारणी केली जात होती. त्याऐवजी त्या जुन्या पंपांना बॅटरी बसविण्यात आली. त्यामुळे कष्ट कमी झाले मात्र ड्रोनद्वारे तर अधिक सोपे झाले. जसे पीक वाढले तसे या पिकांवर रोगाचा प्रादुर्भावही वाढला. हेलिकॉप्टरसारख्या ड्रोनने कमाल केली. एकरामध्ये मजुराद्वारे औषध फवारणी करण्यासाठी 200 लीटर औषधमिश्रित पाणी लागत होते परंतु ड्रोनला फक्त 10 लीटर लागते.
या ड्रोनला सहा पाती असून त्यालाच पंखे बसविण्यात आले आहे. मशीनच्या खाली 10 लीटरची एक टाकी आहे आणि त्याला बॅटरी बसवली आहे. एकदा बॅटरी चार्ज करून लावल्यानंतर तीन तास फवारणी केली जाऊ शकते. ड्रोन उडवण्यासाठी रिमोट असतो. रिमोटने ड्रोन कंट्रोल करून पिकांवर ड्रोनद्वारे फवारणी केली जाते.