क्रांती कारखान्याच्या शेतकर्‍याने केले एकरी 131 टन उच्चांकी उसाचे उत्पादन

कुंडल: क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी.पी.बापू लाड साखर कारखान्याच्या पायलट योजनेतील शेतकरी उदय लाड यांनी एकरी 131.434 टनाचे उच्चांकी ऊस उत्पादन घेतले. या कारखान्याने सर्वोच्च उत्पादनाचे उद्दीष्ट गाठले आहे.

क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी.पी.बापू लाड कारखान्याने पथदर्शक प्रकल्पातून अधिक प्रयत्न करून जास्त उत्पादन होण्यासाठी प्रयत्न केले. त्यातील उदय लाड या शेतकर्‍याने उच्चांकी ऊस उत्पादनाचे उदिष्ट गाठले. कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी उदय लाड यांच्या शेतात जाऊन शेतावर जाऊन त्यांना जागेत क्रांती कारखान्याच्या पायलट योजनेतून लागण केली. कारखान्याच्या ऊस विकास विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नांगरगट, रोटर अशी पूर्वमशागत करून माती परीक्षण केले.

उदय लाड यांनी एकरी 2 ट्रेलर क्रांती कंपोस्ट आणि 15 डंपिंग ट्रेलर शेतखताचा वापर केला. तसेच हिरवळीचे खत म्हणून तागाचे पीक घेतले. साडेचार फुटांवर सरी काढून, दोन फूट अंतराने एक डोळा लागण केली. लागणीसाठी कारखान्याचे प्रमाणित बेणे प्रक्रिया करून वापरले. उभ्या उसातील वाळलेले पाचट 2 वेळा काढून सरीमध्ये आच्छादान केले. ऊसाची वाढ नियमित राहण्यासाठी त्यांनी अन्नघटक, जिवाणू खते व जैव संजीवकच्या तब्बल 7 फवारण्या घेतल्या.

यंदाच्या हंगामात अनेक शेतकर्‍यांनी 100 टनावार एकरी ऊस उत्पादन घेतले आहे. ‘फक्त ठराविक शेतकर्‍यांसाठीच नव्हे तर कार्यक्षेत्रातील एकूण सरासरी उत्पादन वाढवण्यासाठी पथदर्शक प्रकल्प राबविणार असल्याचे क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी संगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *