महात्मा गांधींच्या पुण्यतिथी निमित्त पुष्पांजली अर्पण करून अभिवादन

सांगली: कुंडल येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यामध्ये कारखान्याच्या पुण्यतिथिच्या निमित्ताने महान व्यक्तिमत्व असलेल्या महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्प वाहून व त्यांचे विचार आत्मसात करून पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी क्रांतिअग्रणीचे अध्यक्ष शरद लाड म्हणाले, “महात्मा गांधी व्यक्ती नव्हते, विचार होते. त्यांच्या मूल्यांचा आपल्या जीवनात अवलंब करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल. व्यक्तिला मारले जाते परंतु त्याच्या विचारला मारले जात नाही, महात्मा गांधींच्या विचारांची आजही देशाला घराज आहे. त्यांना कोणी मारले असा विचार करण्यापेक्षा त्या व्यक्तीचे विचार दडपणे हेच एक क्रौर कृत्या आहे.”

गांधीजींच्या प्रेरणेनेच क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू यांसारखे हजारो स्वातंत्र सैनिक घडले त्यामुळे अशा प्रेरणादायी विचारांचा आणि आचारांचा जागर आयुष्यभर करूया असे आव्हाहन लाड यांनी केले. यावेळी, क्रांति स्कूलचे रणजीत लाड, विक्रांत लाड, संचालक जितेंद्र पाटील, अनिल पवार, जयप्रकाश साळुंके, बाळकृष्ण दिवाण, किरण गावडे, कार्यकारी संचालक सी. एस. गव्हाणे यांच्यासह आदि कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *