अहमदनगर: सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याने कारखान्यांच्या शेतकर्यांसाठी हेल्पलाईन नंबर तयार केला असून सर्व सभासद शेतकर्यांनी नंबरचा वापर करावा असे आव्हाहान शेतकर्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले आहे.
कोल्हे साखर कारखान्याने ‘9371712622’ हा हेल्पलाईन नंबर तयार केला आहे. कारखान्याच्या कामासंदर्भात हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे उपाध्यक्ष मनेश गाडे, संचालक व का.संचालक बाजीराव सुतार यांनी संगितले आहे. हेल्पलाईन नंबर तयार करण्यामागील उद्देश असा आहे की, दैनंदिन प्रशासकीय कामकाजात गतीमानता आणून त्याचा थेट सभासद शेतकर्यांना लाभ व्हावा असे कोल्हे यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया ऑनलाइन कामकाज संकल्पनेला प्राध्यान्य दिले आहे. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनराव कोल्हे यांनी हायटेक डिजिटल संकल्पनेची सुरुवात कोल्हे साखर कारखान्यात केली आहे.