कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षा कै. शारदाताई टोपे यांच्या जयंती निमित्त उस तोड कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर राबविण्यात आले. कारखाना कार्यस्थळावरील त्यांच्या अर्धकृती पुतळ्यास पार्थ राजेश टोपे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या शिबिरामध्ये 200 स्त्री-पुरुषांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शेतकरी व आरोग्य विभागातील कर्मचार्यांनी ऊस तोडणी वाहतूक मजुरांच्या कोपीतळामध्ये प्रत्यक्ष जाऊन या शिबिराबाबतची माहिती दिली. कारखान्याच्या ऊस गळीत हंगाम 2023-24 मध्ये ऊस तोडणी वाहतुकीसाठी आलेल्या मजुरांचे हंगाम कालावधीमध्ये आरोग्य तपासणी शिबीर घेण्याच्या सूचना साखर आयुक्त पत्रिकेत केल्या आहेत.
कारखानयाद्वारे दरवर्षी ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य शिबीर आयोजीत केले जाते. यामध्ये महिलांसाठी सर्वरोग निदान शिबीर, रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, दिव्यांग तपासणी व मोफत कृत्रिम अवयव वाटप शिबीर, ऊस तोड वाहतूक मजूर आरोग्य तपासणी शिबीर, मोफत श्रवणयंत्र वाटप शिबीर आयोजित करून औषधोपचार केले जातात.
कार्यक्रमाला सौ. मनीषाताई टोपे, पार्थ टोपे, जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश टोपे, कारखान्याचे उपाध्यक्ष उत्तमराव पवार, मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी बी. आर. गायकवाड, प्राथमिक आरोग्य केंद्र शहागडचे कर्मचारी, समर्थ आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, टोपे परिवरातील सर्व सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, ऊस उत्पादक, शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, कामगार व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.