कृषि विभागाचे दुर्लक्ष, कष्टाने पिकवलेल्या उसावर तांबोरा रोगाचा प्रभाव  

महाराष्ट्रात साखर हंगामाने वेग घेतला आहे. नुकतीच ऊस पिकाची भरणी झाली आहे. परंतु दानोळी परिसरातील ऊस पिकावर मोठ्या प्रमाणात ‘तांबेरा’ रोगाचा परिणाम झालेला दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी अतिशय चिंतेत आहेत.

      दानोळी, कोथळी, निमशिरगाव, कवठेसार यासह इतर परिसरातील ऊसाची पाने पिवळी पडून त्यावर लाल ठिपके पडत आहेत. तांबेरा रोगाची ही लक्षणे आहेत. विशेषतः को २६५ जातीच्या उसावर या रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. ऊसाच्या या स्थितीमुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचा असा प्रश्न आहे की, अशी परिसस्थिती निर्माण होईपर्यंत तालुका कृषि विभाग काय करत असतो?

      दानोळीसह इतर गावांमधील शेतांमध्ये ऊस पिकवण्याचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये को २६५ आणि ८६०३२ या वाणांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते, आणि या जातींमध्येच तांबोरा रोगाचा प्रभाव होत आहे. याचा परिणाम शेतकर्‍यांच्या उत्पन्नावर होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे ढगाळ वातावरण व वाढती थंडी यामुळे पिकाची वाढ थांबली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नाची सरासरी घटण्याची शक्यता दिसून येते. जुलै आणि ऑगस्ट या दरम्यान ऊसाची लागवड केली जाते. तसेच चालू ऊस दरापेक्षा बियाणांचा दर हा दीडपट असतो. चांगल्या गुणवत्तेचे बियाणे मिळवण्यासाठी शेतकरी अधिक पैसे देतात. नांगरणी, सरी सोडणे, वाकुरी, खते आणि भरणीपर्यंत शेतकर्‍याला एकरी ५०,००० ते ६०,००० पर्यंत खर्च येतो. यावर्षी उन्हाळ्यातील पाणी टंचाईमुळे शेतकर्‍यांनी बोरवेल, नदी, विहीरीतील पाण्याचा वापर करून उसाचे पीक वाचवले आहे. या परिसरात पाऊस न पडल्यामुळे पाण्याची अतिशय कमी आहे. अश्या परिसस्थितीत शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने ऊस पिकाची लागवड केली आहे. परंतु तांबोरा रोगाने मात्र शेतकरी त्रस्त झाले आहेत. अश्या विविध रोगांबाबत कृषि विभागाकडून शेतकर्‍यांना वेळच्या वेळी मार्गदर्शन मिळणे खूप महत्वाचे आहे.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *