कुंभी कासारी साखर कारखान्यात ऊसपीक परिसंवाद

सातारा: शेतकर्‍यांनी जर खोडवा व्यवस्थापन करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला, तर खोडवा पिकाला सरासरी निम्याने उत्पादन खर्च कमी होत असल्याने खोडवा पीक शेतकर्‍यांना वरदान ठरते, असे वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटचे शास्त्रज्ञ सुरेश माने-पाटील यांनी संगितले.

कुंभी कासारी साखर कारखाना व ईश्वर फाऊंडेशन मॅन काइंड अॅग्री टेक यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी भवन मध्ये घेण्यात आलेल्या उसपीक परिसंवादात सुरेश-माने पाटील बोलत होते. अध्यक्ष स्थानी कुंभी-कासारी कारखान्याचे कार्यकारी संचालक धीरजकुमार माने होते.

माने-पाटील म्हणाले, कोल्हापूरच्या पश्चिमेला असणार्‍या तालुक्यातील पावसाचे प्रमाण व ढगाळ वाटवरणात ऊसाची वाढ खुंटते. यासाठी नोव्हेंबर ते मे जून महिन्याच्या दरम्यान मिळणार्‍या स्वच्छ व भरपूर सूर्यप्रकाशाचा फायदा उठवून ऊस रोपे वाढीला नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. लावणीपासून भरणीपर्यंत पाच वेळा खतांचे ढोस देताना सेंद्रिय, रसायनिक, जैविक खतांचा समतोल राखणे आवश्यक आहे. 90 व्या दिवशी पक्की भरणी करून रासायनिक खतांचा मोठा ढोस द्यावा. 40,60,80 व 100 अशा फरकाने भरणीच्या अगोदर सेंद्रिय फवारण्या घ्यायला हव्यात.

यावेळी धिरज माने म्हणाले, सुरेश-माने पाटील हे केवळ शास्त्रज्ञ नाहीत तर शेतकर्‍यांना प्रेरक मार्गदर्शन आहेत. मॅन काइंडचे नितिन गाडेकर, ईश्वर फाऊंडेशनचे नितिन जंगम यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. स्वागत व आभार श्री कृष्ण शिंदे यांनी मानले. यावेळी शेती अधिकारी संजय साळवी व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *