छत्रपती संभाजीनगर: कन्नड साखर कारखाना परिसरातील कष्टाळू ऊसतोड कामगारांचा थंडी पासून बचाव होण्यासाठी जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ व शिक्षण महर्षी स्व. के. के. जाधव सेवाभावी प्रतिष्ठान कन्नड यांच्या विद्यमाने 150 ऊसतोड कामगारांना चादरीचे वाटप केले आहे.
कन्नड शहरात गेल्यावर्षी पासून हा सुंदर उपक्रम राबविन्यात येत आहे. ‘मायेची ऊब’ या उपक्रमाद्वारे चादरींचे वाटप जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सागर कृष्णराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आबासाहेब चव्हाण, बाळासाहेब निकम, हेमराज खोब्रागडे, रावसाहेब निकम, जगन्नाथ जाधव, सचिन भामरे, सतोष जाधव, सुभाष जाधव उपस्थित होते.