नगर: जामखेड तालुक्यातला मुंगेवाडी मधल्या एका ऊसतोडणी करणार्या कामगाराचा मुलगा जलसंपदेच्या परीक्षेत यश मिळवून ‘कनिष्ट अभियंता वर्ग-2’ पद मिळवले. खाजगी कंपनीत नोकरी करण्याची इच्छा नसल्याने त्याने प्रशासकीय सेवेत जाण्याचा ध्यास घेतला होता.
या मुलाचे नाव विजय गोकुळ भोसले असून तो जामखेड तालुक्यातील मुंगेवाडी येथील एका ऊसतोडणी कामगाराचा मुलगा आहे. शेतकरी वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेऊन विजयने जलसंपदा क्षेत्रात भरीव आणि सामान्य लोकांच्या हिताचे काम करायचे, असे विचार व्यक्त केले.
विजयचे प्राथमिक शिक्षण त्याच्या गावात जि. प. शाळेत झाले असून पाचवी ते दहाविपर्यंतचे शिक्षण मुंगेवाडी ते पखरूड असा 4 किलोमीटर प्रवास पायी करत केले. दहावी बोर्डाच्या परीक्षेत त्याला 85.88 टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर त्याने बीडमधील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातून डिप्लोमा इंजिनियरिंग केले. डिप्लोमामध्ये त्याने 86.26 गुणाने यश प्राप्त केले होते. त्या नंतर पुण्यातील ट्रीनिटी महाविद्यालयातून 77 टक्के मिळवून विजयने इंजिनिअरिंग पूर्ण केले. त्याला मुळातच खाजगी कंपनीत काम करायचे नव्हते.
जलसंपदा विभाग मार्फत जुलै 2019 मध्ये विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. परंतु कोरोना महामारीमुळे परीक्षा हि परीक्षा ऑगस्ट 2022 मध्ये झाली आणि एप्रिल 2023 मध्ये निकाल जाहीर झाला आणि माला कनिष्ट अभियंता वर्ग-2 पद मिळाले.
परीक्षेचा फॉर्म भरल्यानंतर परीक्षा देण्यापर्यंतचा मधला काळ परीक्षांची असलेली अनिच्छितता यामुळे अतिशय तणावात गेला. बाकीचे सोबती पुढे जात होते आणि आपण आहे तिथेच आहे या विचाराने विजयाला मानसिक त्रास झाला. या काळात विजयाला त्याच्या आई-वडिलांनी, त्याचा मोठा भाऊ व त्याचा मित्रपरिवार यांनी धीर दिला आणि विजय यशस्वी झाला.