पुणे: ऊस रस आणि पाकापसून इथेनॉल निर्मितीवर काही दिवसांपूर्वी पूर्ण निर्बंध लावले गेले होते. 15 जानेवारीला या निर्बंधाचा आढावा घेतला जाईल, अशी हमी केंद्र सरकारने साखर उद्योगाला दिली आहे.
‘इस्मा’ ने पाठपुरवठा केल्यामुळे कोटा ठरवून दिलेल्या साखर कारखान्यांना आता कमीत कमी 25% निर्मिती करता येईल, असा आदेश केंद्राने जाहीर केला आहे. इथेनॉल निर्मितीला किमान 50% सवलत द्यावी अशी आमची मागणी आहे, असे ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे संगितले. त्यामुळे पाठपुरवठा चालू ठेवला जाईल असे देखील त्यांनी संगितले. ‘येत्या 15 जानेवारीला इथेनॉल निर्बंधाचा आढावा घेतला जाईल’, अशी हमी यावेळी केंद्र सरकारने साखर उद्योगाला दिली आहे.
इंडियन शुगर अँड बायो एनर्जि मन्युफॅक्चर्स असोशियनच्या (इस्मा) दिल्लीतील वार्षिक सर्वसाधारण सभेला अन्न मंत्रालयाचे सचिव संजीव चोप्रा हजर होते. त्यांनी सरकारच्या धोरणात्मक वाटचालीवर चर्चा केली. त्यावेळी ऊस रस आणि पाकापसून इथेनॉल निर्मितीवर केंद्राने लागू केलेले निर्बंध हटवावे, अशी इस्मा ने मागणी केली. या मागणीचा विचार करून त्याच रात्री निर्बंध तात्काळ हटविण्याबाबत केंद्राने निर्णय घेतला. केंद्राला देशाला एकूण लागणारी साखर आणि 60 लाख टनांचा राखीव साठा हवा आहे. त्या पेक्षा अधिक असलेल्या साखरेचे रूपांतर किवा निर्यातीबाबतीत केंद्राचा ‘पॉझिटिव्ह’ दृष्टीकोण असल्याचे या चर्चा सत्रातून दिसून येते.