नंदुरबार: ऊस वाहतूकदर वाढविण्यासंदर्भात प्रकाशा येथील महाराष्ट्र ऊसतोड कामगार व उसवाहतूकदर संघटनेतर्फे समशेरपूर येथील आयान शुगर कारखाना प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, अंबालिका साखर कारखान्याचे 40 किलोमीटर अंतरवरील ऊस वाहतूक दर 310 रुपये तर बारामती अॅग्रो वनने 324 रुपये दर दिला आहे. मात्र, समशेरपूर येथील आयान शुगरकडून 253 रुपये दर देण्यात येत आहे. ऊस वाहतुकीच्या दराबाबत दुटप्पी धोरण न ठेवता 40 किलोमीटरसाठी 350 रुपये दर द्यावा, असे म्हटले आहे. हे निवेदन आयान शुगरचे मॅनेजिंग डायरेक्टर पद्माकर टापरे यांना देण्यात आले. निवेदनावर संघटनेचे जिल्हा सचिव खंडू भिला सामुद्रे, सोहिल जहागीरदार, शेख हनिफ, आसिफ जागीरदार, सुनील गावीत, रामसिंग माचवी, नाना कोळी, अरुण महाजन, हेमंत भावसार, वाण्या वसावे, कालसिंग वसावे, महेश महाजन, आकाश गावीत आदींच्या सह्या आहेत.