आजरा: आजरा कारखान्याच्या अध्यक्षपदी वसंतराव धुरे यांची निवड झाली असून उपाध्यक्षपदी एम.के.देसाई यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी धुरे यांचे नाव मुकुंद देसाई यांनी सुचवले होते तर अपाध्यक्षपदी देसाई यांचे नाव ज्येष्ठ संचालक विष्णु केसकर यांनी सुचवले होते.
‘गाळप आणि निवडणूक एकत्र आल्यामुळे जोडण्या लावता आल्या नाहीत, याचा परिणाम गाळपावर होणार आहे. हे वर्ष कठीण प्रवासाचे आहे. यापुढे खर्च कमी व गाळप वाढवण्याचे निच्छित प्रयत्न केले जातील’, असे याप्रसंगी धुरे म्हणाले. ‘ज्या उद्देशाने हा कारखाना काढला आहे तो उद्देश यशस्वी करून दाखवेल व विश्वासाला पात्र राहून कारभार करून दाखवेल’, असे देसाई म्हणाले. त्याचप्रमाणे राष्ट्रवाडी तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई, काशीनाथ तेली यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी नूतन संचालकसह जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, संगरामसिंह कुपेकर, माझी संचालक दिगंबर देसाई, नामदेव नारवेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.
साखर संचालक गोपाळ मावळे यांनी संगितले की, कारखाना सर्वसाधारण सभेत कारखान्याला स्व. वसंतराव देसाई यांचे नाव द्यावे असा ठराव मंजूर झाला होता परंतु निवडणूक जहीर झाल्यामुळे मंजूरी थांबवली. मात्र, आता त्याला मजुरी दिली जाणार आहे. यापुढे कारखान्याचे नाव स्व. वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना, अमृतनगर गवसे असे असणार आहे.