80 एकर ऊस जळाल्याने शेतकर्‍यांचे लाखोंचे नुकसान

सातारा: गोळेश्वर (ता. कराड) येथील कैकाडा शिवारातील उसाला अचानक आग लागली. या आगीत सुमारे 80 एकर ऊस आगीच्या भक्षस्थानी आला. गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत सुमारे 70 शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. परिसरातील शेतकर्‍यांनी उसाचा खोडवा पेटवल्याने त्याच्या झळा पसरून ही आग लागल्याचे शेतकर्‍यांनी संगितले.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड जवळील गोडेश्वर परिसरातील कैकाडा शिवारात शेतकर्‍यांचा ऊस तुटला आहे. ऊस तुटल्यामुळे त्या शेतकर्‍यांनी सकाळी आपल्या शेतातील वाळकी पाचट पेटवली. पाचटीला आग लावली असता ती वार्‍यामुळे इतरत्र पसरू लागली. बघता बघता आग शेजारील उसांना लागली. धूरांचे लोट पसरल्यानंतर ज्या शेतकर्‍यांचे क्षेत्र जळाले त्यांनी ऊसाच्या क्षेत्राकडे धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिस प्रशासन, अग्निशामक दलास स्थानिक शेतकर्‍यांनी दिल्यानंतर काही काळातच त्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. गोळेश्वर गावाचे तलाठी सुजीत थोरात यांनी घटनास्थळी धाव घेत जळालेल्या ऊसाच्या क्षेत्राची पाहणी केली. पंचनामा करीत महसूल विभागास याची माहिती दिली. महसूल विभागाच्या अधिकार्‍यानी देखील घटनास्थळी तात्काळ दाखल होत घटनेची जळालेल्या ऊस क्षेत्राची पाहणी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *